Use APKPure App
Get Tukdoji Maharaj's Gramgita old version APK for Android
जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते.
Tukdoji Maharaj's Gramgita :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म २७ एप्रिल १९०९ साली झाला . त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे होय.त्यांना गुरूमंत्र आडकोजी महाराजांनी दिला . त्यांनी ग्रामगीता , अनुभव सागर भजनावली , सेवास्वधर्म , राष्ट्रीय भजनावली इ . ग्रंथांची रचना केली . त्यांनी आपले आयुष्य जातिभेद निर्मूलन , अंधश्रद्धा निर्मूलन यावर खर्ची घातले . तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली . ख्नंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते . जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते . त्यांच्या अंतरंगात वास करीत असलेली तळमळ ग्रामगीतेतून शब्दरूप होऊन बाहेर पडली आहे . भारतीय नवरचनेच्या संधीकाळात महाराजांनी ही ग्रामगीता जनतेच्या हाती देऊन ग्रामसुधारणेच्या कामाला सैद्धांतिक दिशा दिली आहे . १९५५ साली ग्रामगीतेची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली . या पुस्तकाला एकदोन नाही , तब्बल नऊ प्रस्तावना आहेत . शिवाय तुकडोजी महाराजांच्या चरित्राचे अकरा खंड लिहिणा - या सुदाम सावरकरांनी महाराजांच्या कामाची चार पानात करून दिलेली ओळख आहे . प्रस्तावना लिहिणा - यांत विनोबा , गाडगेमहाराज , मामासाहेब सोनोपंत दांडेकर , दादा धर्माधिकारी , श्रीपाद सातवळेकर अशा अध्यात्माच्या क्षेत्रातील त्याकाळातली सर्वात टॉपची मंडळी आहेत . तर वि . स . खांडेकर , वि . भि . कोलते आणि ग . त्र्यं . माडखोलकर अशी साहित्यातली दादा माणसंही आहेत . शिवाय तेव्हाच्या मध्य प्रांत राज्याचे समाजकल्याणमंत्री दीनदयाल गुप्त यांनीही लिहिलं आहे .
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची " ग्रामगीता ' म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रूप होय . तुकडोजी महाराज गावागावाच्या सेवेसाठी आयुष्यभर भटकत राहिले . त्यांनी खेड्यापाड्याच्या रूपात उभ्या असलेल्या गाव - संस्कृतीचे उत्कट दर्शन घेतले आणि ते ग्रामगीतेतून समर्थपणे व्यक्त झाले .
ग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्गार म्हणजे ग्रामगीता होय . तुकडोजी महाराज म्हणायचे , " माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात असला , अनुभवरूपाने तो मनात वा चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे . विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे , हीच माझी दैवते आहेत . ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे .
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे . हा गाव सुखी व्हावा . सर्वार्थाने समृद्ध व्हावा . परस्परांचा स्नेहभाव जागवावा . ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेत , त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावी , मानवतेचे तेज झळाळावे , या आर्त तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता अर्पण करून ग्रामजीवनात समृद्धीचे पूर्णत्व आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली आहे .राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मृत्यु ११ ऑक्टोबर १९६८ रोजी झाला .
Last updated on Nov 21, 2023
Bug fixes and some improvements
Uploaded by
Elen Andrea
Requires Android
Android 5.0+
Category
Report
Tukdoji Maharaj's Gramgita
1.6 by Piyush Chaudhari
Jul 28, 2024