१ जानेवारी २०१४ रोजी दादांनी शिवाजीनगर येथे छावा क्रांतिवीर सेनेची स्थापना केली
सर्वप्रथम महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तूळजाभवानी माता तसेच सिंहाच काळीज पोलादी छाती असे राजे शिवछत्रपती व ज्यांच्या नावाने आपण आपल्या संघटनेची घोडदौड करतो ते धर्मवीर छत्रपती संभाजी राजे व महाराष्ट्रातील सर्व क्रांतीकारी नेतृत्वांना मानाचा मुजरा..!!!
बालपणापासुन अन्याय अत्याचार सहन न होणारे आपले करणदादा शिवशंभुचा आदर्श घेऊन समाजकार्यात उतरले. अखिल भारतीय छावात अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुखापासुन तर जिल्ह्यअध्यक्षापर्यंत नाशिक जिल्ह्यातील अनेक समस्या सोडवल्या.पंरतु अण्णासाहेबांच्या निधनानंतर दादा जनतेवरील अन्याय सहन करू शकत नव्हते. अण्णासाहेबाची शिकवण स्वस्थ बसु देत नव्हती.
म्हणुनच १ जानेवारी २०१४ रोजी आपल्या अभिष्ठचिंतनाप्रसंगी दादांनी शिवाजीनगर येथे छावा क्रांतिवीर सेनेची स्थापना केली. त्यावेळी लावलेल्या रोपट्याच रुपांतर आज वटवृक्षात झाल आहे संपुर्ण महाराष्ट्रात छावा क्रांतीवीर सेना आज अग्रेसर आहे."|| जय छावा ||